मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची तर निफ्टीमध्ये २२५ अंकांची घसरण झाली आहे. GDP दरामध्ये घसरण झाल्याचा परिणाम शेअर बाजारावर झालेला पाहण्यास मिळाला. GDP दरात घसरण झाल्याचा परिणाम शेअर बाजारात पाहण्यास मिळाला. आज दुपारी सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला.

सुरुवातीला सेन्सेक्स ४१३ अंकांनी घसरुन ३६,९१९.२१ अंकांवर व्यवहार सुरु होते. मात्र दुपारच्या सुमाराला सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची घसरण झाली. ऑगस्टमध्ये विक्री घटल्याने शेअर बाजारात निराशेचं वातावरण आहे. उत्पादन घटल्याने गुंतवणूक आणि खर्च यातलं नुकसानही भरुन निघालेलं नाही. जीडीपी दराने सहा वर्षातल्या निचांकी आकडा गाठल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर झालेला पाहण्यास मिळाला.

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या ट्रेड वॉर सुरु आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवरचा टॅरिफ वाढवला आहे. ज्याचा परिणाम आशियाई देशांमधील बाजारांवरही पाहण्यास मिळतो आहे.