सौदीमधल्या अरामको या कंपनीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला. याचाच परिणाम मुंबई शेअर बाजारावरही दिसून आला. ६६६ अंकांनी सेन्सेक्स कोसळला. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सेन्सेक्स ६५० अंकांनी कोसळला आणि त्यानंतर काही वेळातच ६६६ अंकांनी कोसळला.

गेल्या आठवड्यात सौदी येथील अरामको कंपनीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा परिणाम जगभरातल्या इंधन पुरवठ्यावर झाला. कच्च्या तेलाच्या किंमती चांगल्याच भडकल्या. याचाच प्रत्यक्ष परिणाम शेअर बाजारावर झालेला पाहण्यास मिळाला.याआधी ३ सप्टेंबरला सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची घसरण दिसून आली होती. ऑगस्टमध्ये विक्री घटल्याने शेअर बाजारात निराशेचं वातावरण दिसून आलं होतं. उत्पादन घटल्याने गुंतवणूक आणि खर्च यातलं नुकसानही भरुन निघालेलं नाही. जीडीपी दराने सहा वर्षातल्या निचांकी आकडा गाठल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर झालेला पाहण्यास मिळाला होता. आता सौदीमध्ये तेल कंपनीवर झालेल्या हल्ल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.