अमेरिका आणि चीनमध्ये सुरु झालेल्या ट्रेड वॉरचे मोठे परिणाम शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात पहायला मिळाले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) सेन्सेक्स ३५५ अंशांनी घसरण झाली आणि तो ३२,६५० वर स्थिरावला. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (एनएसई) निफ्टीतही घट होऊन तो १० हजारांच्या खाली जात ९९६८ वर बाजाराला सुरुवात झाली.


माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्स झपाट्याने कोसळल्याने याचा थेट परिणाम शेअर बाजारात पहायला मिळाला आहे. त्याला कारण ठरले आहे, अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आलेले एक विधेयक. या विधेयकामुळे हा परिणाम पहायला मिळाला आहे. या विधेयकामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून वस्तू आयात केल्यास ६० बिलिअन डॉलर म्हणजेच ३९१० अब्ज रुपये भाडे आकारण्याची घोषणा केली. त्यानंतर चीनने देखील काही अमेरिकी उत्पादनांची यादी जाहीर केली ज्यावर ते मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लागू करण्याच्या तयारीत आहेत.  तसेच अमेरिकन कंपन्यांच्या मदतीसाठी परदेशातील आऊटसोर्सिंगवर बंधने आणण्यात येणार आहेत.

जागतिक भांडवली बाजारातील अस्वस्थतेमुळे भारतातील बाजारावर त्याचे परिणाम पहायला मिळाले आहेत.