करोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. त्यामुळे केवळ या साथीच्या नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड—१९ हे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून त्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ले. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य सरकारच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक ३९२३९५९१७२० आहे. संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के  सूट देण्यात येते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी—कोविड १९

*   बँकेचे बचत खाते क्रमांक— ३९२३९५९१७२०.

*  स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई – ४०००२३ शाखा कोड – ००३००

*  आयएफएससी – एसबीआयएन ००००३००.