News Flash

Coronavirus: धारावीसाठी कृती आराखडा तयार

धारावीत स्क्रिनिंगलाही सुरुवात

करोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढतो आहे. मुंबईतली रुग्णांची संख्या ११८२ झाली आहे. मुंबईतल्या धारावी या अत्यंत गजबजलेल्या भागात चार रुग्णांचा मृत्यू हा करोनामुळे झाला आहे. त्यामुळे धारावीसाठी वेगळा कृती आराखडा अर्थात Action Plan तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

काय आहे हा अॅक्शन प्लान?

डॉक्टरांच्या एकूण १० टीम तयार करण्यात आल्या आहेत

जी दहा पथकं तयार करण्यात आली आहेत त्यांच्याकडे ५०० PPE किट्स, मास्क ग्लोव्ज आणि थर्मल स्कॅनर असणार आहेत.

यामध्ये २ खासगी डॉक्टर, एक आरोग्य अधिकारी आणि २ कर्मचारी यांचा समावेश असेल.

धारावीमध्ये २२५ सार्वजनिक स्वच्छतागृहं आहेत. या सगळ्यांची दररोज काही वेळाने स्वच्छता करणे

जे करोना प्रतिबंधित भाग आहेत त्यांचं दररोज निर्जंतुकीकरण केलं जाणार

करोना प्रतिबंधित भागातले मेडिकल स्टोअर्स वगळता सगळी दुकानं बंद ठेवली जाणार

सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आहे ना हे पाहिलं जाणार

अशा सगळ्या गोष्टींचा समावेश या अॅक्शन प्लानमध्ये आहे. मुंबईतल्या धारावीत आजपासून स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी १५० डॉक्टरांची टीम कार्यरत आहेत. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे हे सगळे सदस्य आहेत. मुंबई महापालिकेच्या सहाय्याने हे स्क्रिनिंग केले जाते आहे.

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या १२०० च्या अगदी जवळ पोहचली आहे. अशात धारावीसारख्या भागातून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 11:00 pm

Web Title: separate action plan ready for dharavi says government scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 याला म्हणतात वर्क फ्रॉम होम… वरळीच्या घरातूनच थेट समुद्रात मासेमारी
2 मुंबईत २४ तासात ११ मृत्यू, १८९ करोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ११८२
3 धक्कादायक, एकटया मुंबईत Covid-19 चे ६१ टक्के रुग्ण
Just Now!
X