24 November 2020

News Flash

नालासोपाऱ्यात घुसलेल्या सीरियल रेपिस्टला मीरा रोड येथून अटक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नालासोपारा येथील १२ मुलींवर बलात्कार करणाऱ्या विकृताला नवी मुंबई पोलिसांनी अखेर मीरा रोड येथून केली अटक केली आहे.

बलात्कारी व्यक्तीचे छायाचित्र.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नालासोपारा येथील १२ मुलींवर बलात्कार करणाऱ्या विकृताला नवी मुंबई पोलिसांनी अखेर मीरा रोड येथून केली अटक केली आहे.
मुंबई आणि ठाण्यात अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा (सीरियल रेपिस्ट) विकृत नालासोपारामध्ये दाखल झाला होता. चार दिवसांत त्याने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांनी अनेक पथके स्थापन केली होती. दरम्यान, पालक आणि मुलींना पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला होता. पोलिसांनी शाळांमधून बैठका घेऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून एका विकृत तरुण अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. अल्पवयीन मुलींना गाठून ‘तुझ्या वडिलांनी बोलावले आहे’, ‘तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे’ अशा सबबी सांगून निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगत कपडे काढायला सांगायचा आणि मग त्या मुलीवर बलात्कार करायचा. ठाणे आणि मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते.

मंगळवारी त्याने नालासोपारा पूर्वेच्या संखेश्वरनगरमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने गुरुवारी एव्हरशाईननगर येथे अशाच पद्धतीने मुलीला फूस लावून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या विकृताला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. पीडित मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही चित्रण मिळाले, त्यात हाच विकृत असल्याचे पीडित मुलींनी ओळखले. पोलिसांनी त्याची छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावली. पालकांना आणि मुलांना सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 8:46 pm

Web Title: serail rapist arrest from mira road
Next Stories
1 ठाण्यात दणदणाट करणाऱ्या ३५ गणेश मंडळांवर कारवाई?
2 अनुराधा पौडवाल यांनाही ३८ लाखांचा गंडा
3 उल्हासनगरात भाजप सत्तेच्या कलानी!
Just Now!
X