नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आलेल्या रेहान कुरेशी या सीरियल रेपिस्टने दोन हत्यांची कबुली दिली आहे. या नराधमाने १८ गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि दोन हत्यांचा समावेश आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरेशीन कुर्ल्यातील नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीत चिमुरडीची हत्या केल्याचे त्याच्या चौकशीदरम्यान समजले आहे. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि पालघर या भागांमध्येही गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेहान कुरेशी हा विकृत तरूण अल्पवयीन मुलीना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. अल्पवयीन मुलींना गाठून तुझ्या वडिलांनी तुला बोलावले आहे, तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे अशी कारणं सांगून मुलींना निर्जन स्थळी घेऊन जायचा. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे असे सांगत तिला कपडे काढायला सांगायचा आणि मग त्या मुलीवर बलात्कार करायचा. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतच त्याने १८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

कफ परेड, कुर्ला या ठिकाणी जाऊन तपास केल्यानंतर पोलिसांना या कुर्ल्यातील लहान मुलीला याच नराधमाने ठार केल्याचे समजले. २००५ पासून अशा अनेक गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत. पॉस्को, विनयभंग, बलात्कार आणि हत्या असे गुन्हे या नराधमावर नोंदवण्यात आले आहेत. मुंबईत त्याने पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serial rapist rehan qureshi accepted two murder and 18 other crimes
First published on: 16-10-2018 at 19:44 IST