हिरे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या नोकरानेच तिजोरीतील ८५ लाखांचे हिरे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील डायमंड मार्केटमध्ये  अजित शेठ यांचे हिरे खरेदी विक्रीचे दुकान आहे. प्रकाश चौधरी (२५) या नोकराकडे शेठ यांनी विश्वासाने तिजोरीची चावी दिली होती. मात्र मंगळवारी रात्री त्याने तिजोरी उघडून त्यातील ८५ लाख रुपये किंमतीचे हिरे चोरले.सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात प्रकाश हिरे चोरी करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.