News Flash

सातवे हृदयरोपण

मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात सातवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात सातवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या वेळी पुन्हा एकदा सुरतवरून हृदयाचा प्रवास मुंबईकडे झाला. १ तास २४ मिनिटांमध्ये २५७ किलोमीटरचा पल्ला पार केलेल्या हृदयाची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ४२ वर्षांच्या पुरुषावर करण्यात आली.

सुरत येथील आयुष रुग्णालयात मृत पावलेल्या ५२ वर्षांच्या पुरुषाच्या नातेवाईकांनी हृदय, मूत्रपिंड व यकृतदानासाठी परवानगी दिली. त्यानंतर रात्री २.५० वाजता सुरतमधील रुग्णालयातून हृदयाचा प्रवास सुरू झाला. सुरत विमानतळावर ३.०४ वाजता पोहोचल्यावर चार्टर्ड विमानातून मुंबई विमानतळावर ३.५५ वाजता व तेथून ग्रीन कॉरिडोअरमार्फत फोर्टिस रुग्णालयात ४.११ वाजता हृदय पोहोचले. त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाली व ११ वाजता रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2016 12:15 am

Web Title: seven heart transplant surgery
Next Stories
1 तंत्रशिक्षण संचालनालयाचा कारभार अधांतरी!
2 ज्येष्ठ पत्रकार राम प्रधान यांचे निधन
3 उद्योगांना स्वस्त विजेचे गाजरच?
Just Now!
X