पहिल्याच पावसात मुंब््रय़ातील संजयनगर या टेकडीवरील भागात एका सिमेंटच्या संरक्षक भिंतीचा भाग लगतच्या चाळीवर कोसळून एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. गेले महिनाभर इमारत दुर्घटनेमुळे चर्चेत राहिलेले मुंब्रा शहर या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आले आहे.
मुंब््रय़ातील गावदेवी रस्त्यावर संजयनगर हा भाग टेकडीवर आहे. म्हात्रे चाळीला लागून एक सिमेंटची संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने भिंतीचा काही भाग खचून पहाटे ही भिंत म्हात्रे चाळीवर कोसळली.
ढिगारा चाळीवर पडल्याने राजू जाधव (वय ४५), पत्नी लक्ष्मी (वय ४०), मुली अंजू (वय १८), मंजू (१४), मुलगा सागर (वय १२) आणि जाधव यांच्या बहिणीची सात वर्षांची मुलगी लक्ष्मी हे जखमी झाले.  त्यांना तातडीने कळव्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मेघायल, शिलॉंग व सीएमजे विद्यापीठांच्या बनावट पीएच.डी वा एम.फील पदव्या घेऊन राज्यातील अकृषिक विद्यापीठे व सलग्न महाविद्यालयांमध्ये नोकऱ्या  मिळविलेल्या प्राध्यपकांना बडतर्फ करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढले आहेत.