News Flash

करोनाचा कहर : राज्यात आणखी सात जणांना संसर्ग

राज्यात शनिवारी १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात नव्याने सात करोनाबाधित रुग्ण शनिवारी आढळून आले. हे रुग्ण मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि यवतमाळ येथे आढळले असून, राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ झाली आहे.

मुंबईत हिंदुजामध्ये आढळलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. हिंदुजा रुग्णालयात या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या आठही जणांचे अहवाल नकारात्मक आले असून, त्यांना हिंदुजामध्येच विलगीकरण कक्षामध्ये ठेवले आहे.

वाशी, कल्याण आणि कामोठे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यात ३७ ते ५९ वयोगटातील पुरुष असून ते अमेरिका, फ्रान्स आणि फिलिपाइन्सहून देशात परतले आहेत. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी ठेवले आहे. नागपूर येथे ४३ वर्षीय पुरुषाला करोनाचा संसर्ग झाला असून तो कतारमधून प्रवास करून आलेला आहे. दुबईत पर्यटनाला गेलेल्या ४० जणांच्या गटातील यवतमाळच्या दोन जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले.

राज्यात शनिवारी १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या नव्या सूचनेनुसार, शनिवारी मध्यरात्रीपासून जे प्रवासी चीन, इटली, इराण, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून भारतात येतील त्यांना १४ दिवसांकरिता क्वारंटाइन (विलगीकरण) करण्यात येणार आहे. अशा एकूण ४ प्रवाशांना काल वेगळे ठेवले आहे. यापैकी एकाला पुण्यात, तर इतर तिघांना मुंबईत ठेवण्यात आले आहे.

संशयित रुग्णांची संख्या

पुणे – १७, मुंबई – ७२, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर -१६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ – ९, वाय.सी.एम. रुग्णालय पिंपरी चिंचवड – ३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 1:47 am

Web Title: seven more infected in the state abn 97
Next Stories
1 मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार केल्यास कारवाई
2 कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद
3 केईएममध्ये लवकरच करोना तपासणी प्रयोगशाळा
Just Now!
X