कांदिवली पोईसर

येत्या दीड-दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला असताना कांदिवली पोईसर येथील नाल्याची साफसफाई करण्यात प्रशासन अपयशी ठरले.  या परिसरात अनेक शाळा-महाविद्यालये रुग्णालये यांना त्याचा उपयोग होतो. मात्र या नाल्याची सापसफाई नीट न झाल्याने पावसाळ्यात या मार्गाने जाणाऱ्या आणि या भागात राहणाऱ्या रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मालाड-मालवणी

पावसाळ्यात मालाड-मालवणी भागात पाणी साचत असल्याचा आजवरचा इतिहास आहे.  दरवर्षी साफसफाईचा घाट पालिकेकडून घालण्यात येतो. मात्र अद्याप या नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने यंदाही या भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वांद्रे पूर्व

वांद्रे पूर्वे आणि टर्मिनलच्या परिसरात असणाऱ्या नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून या मार्गाची ख्याती आहे. त्यातच रेल्वे स्थानकालगत झोपडपट्टी असल्याचे या भागात मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होत असतो. याची कल्पना असतानाही या भागात साफसफाई करण्यात न आल्याने याचा फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.