X

नातवावर आजोबाचा लैंगिक अत्याचार

मुलाचे कुटुंब चेंबूर वाशीनाका येथे राहतात. मुलाच्या आईची मावशी कुर्ला पूर्व नेहरू नगर येथे राहते.

 

आजारी आजीला पाहण्यासाठी आईसोबत आलेल्या ११ वर्षांच्या नातवावर ६५ वर्षीय आजोबाने अनसíगक लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार कुर्ला पूर्व येथील श्रमजीवी नगर येथे उघडकीस आला आहे. आजोबाविरुद्ध नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मुलाचे कुटुंब चेंबूर वाशीनाका येथे राहतात. मुलाच्या आईची मावशी कुर्ला पूर्व नेहरू नगर येथे राहते. आजारी मावस आजीला पाहण्यासाठी मुलगा आईसोबत दहा दिवसांपूर्वी कुर्ला पूर्व श्रमजीवी नगर येथे आला होता. आई मावशीसोबत बोलत असताना मुलाचे आजोबा नातवाला दुसऱ्या खोलीत घेऊन आले व त्या ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने झालेला प्रकार आईवडिलांपासून लपवून ठेवला. मुलाच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवत असल्यामुळे आईने त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला.

हा प्रकार ऐकून मुलाच्या आईला धक्काच बसला. तिने ताबडतोब मुलाला डॉक्टरांकडे नेऊन तपासले असता त्याच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले.

दरम्यान मुलाच्या कुटुंबीयांनी एका लहान मुलांच्या संस्थेशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने ३० मे रोजी नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची खात्री करून आजोबाविरुद्ध अनसíगक अत्याचार, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

First Published on: June 14, 2016 12:08 am
  • Tags: Mumbai, sexual-assault,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain