‘शंकर ब्रह्ने समाजविज्ञान ग्रंथालया‘चा उपक्रम

मुंबई : पुण्याच्या ‘शंकर ब्रह्ने समाजविज्ञान ग्रंथालया‘ने ‘जागतिक सिनेमा आणू या मराठीत‘ हा उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार परदेशी चित्रपटांना मराठी जागतिक सिनेमा आणू या मराठीत सबटायटल्स देऊन ते खासगी प्रक्षेपणासाठी खुले के ले जातात. प्रेक्षकांना हे चित्रपट पाहाण्यासोबतच त्याचे सबटायटल्स तयार करण्याच्या कामातही

juna furniture team exclusive interview at loksatta digital adda
Video : महेश मांजरेकरांना १० वर्षांपूर्वीच सुचलेलं ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं कथानक, सांगितला भावुक किस्सा
marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

सहभागी होता येईल. परंतु या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची देवाण-घेवाण के ली जात नाही.

शंकर ब्रrो समाजविज्ञान ग्रंथालयाचे विश्वस्त सुहास परांजपे, त्यांच्या पत्नी स्वातीजा मनोरमा आणि विश्वस्त अद्वैत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. विविध संस्कृतींतील, विविध भाषांतील उत्कृष्ट चित्रपट मराठी भाषकांपर्यंत पोहोचावेत हा या उपक्रमामागील उद्देश आहे. साधारण महिन्याभराच्या कालावधीसाठी हे चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतात. मात्र, त्याचे सार्वजनिक प्रक्षेपण करण्याची परवानगी नसते. चित्रपटासोबत रसग्रहणपर टीपणही दिले जाते. दर आठवडय़ाला एक याप्रमाणे ११ एप्रिलपासून १६ सिनेमे संस्थेने सबटायटलसह उपलब्ध के ले आहेत. यात इंग्रजी, फ्रे ंच, जपानी या भाषांतील अलोन इन बर्लिन, मँडेला – लाँग वॉक टू फ्रीडम, ब्युटीफु ल माइंड, द व्हाइट बलून, क्वीन ऑफ काटवे इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.

सबटायटल्स तयार करण्यासाठी संस्थेतर्फे  प्रेक्षकांनाही आवाहन के ले जात आहे. यूटय़ूब, टोरंट येथे उपलब्ध असणारे किं वा खासगी संग्रहातील चांगल्या चित्रपटांची निवड के ली जाते. तो चित्रपट सबटायटल तयार करणाऱ्या व्यक्तीस ई-मेलद्वारे पाठवला जातो. प्रतिदिन २५० ते ३०० शब्द या वेगाने अनुवाद केल्यास साधारण एका महिन्यात एक चित्रपट पूर्ण होतो.

अनुवादित मराठी संवाद चित्रपटाला जोडण्याचे काम संस्थेतर्फे  के ले जाते. सबटायटल जोडलेला चित्रपट गूगल ड्राइव्हमध्ये जतन करून त्याची लिंक प्रेक्षकांना पाठवली जाते. उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क  – सुहास परांजपे – ९९८७०७०७९२. ई-मेल आयडी –   brahmegranthalaya@gmail.com, संकेतस्थळ –   brahmegranthalaya.org, यूटय़ूब लिंक – https://www.youtube.com/channel/UC1m-OzA7KqtrjNPIJzpRMyA