‘षण्मुखानंद फाइन आर्ट आणि संगीत सभे’चे यंदाचे हीरक महोत्सवी वर्ष तर या संस्थेच्या सभागृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यातच ११ मे रोजी १५ हजारावा संगीत कार्यक्रम सादर करून या संस्थेने देशभरातील सभागृहांमध्ये एक विक्रमच केला आहे.१९६३ मध्ये तत्कालीन राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शास्त्रीय संगीत, भरत नाटय़म आदी कलांचे सर्वोत्तम सादरीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाद्यवृदांचे कार्यक्रम या षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहाने पाहिले आहेत. त्याचप्रमाणे हे सभागृह राजकीय सभा आणि संमेलनांचे साक्षीदारही आहे.
ए. आर. अय्यंगार, एम. एस. सुब्बलक्ष्मी, एम. एल. वसंतकुमारी, सी. व्ही. भागवतार, पलघट मणी, लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, उस्ताद बिस्मिल्ला खान, उस्ताद अल्लारखाँ, गुलाम अली, उस्ताद बडे गुलाम अली यांचे गायन, हेमामालिनी, वैजयंतीमाला यांचे नृत्य, ऑस्ट्रेलियन बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम, रशियन बॅले, फ्रेंच बॅले, सिनसिनाटी वाद्यवृंद आदी कार्यक्रम येथे झाले. युगोस्लावियाची लोकनृत्ये आणि झुबीन मेहता यांच वाद्यवृंद या आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रमांव्यतिरिक्त विविध पक्षांची अधिवेशने आणि चित्रपट पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमही येथे झाले. जवळपास सर्व राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि प्रमुख नेते वेगवेगळ्या कारणासाठी उपस्थित राहिले असतील असे हे देशातील एकमेव सभागृह आहे. ‘आज षण्मुखानंद सभा ही एक जिवंत परंपरा झाली असून सभागृह त्याचे प्रतीक बनले आहे,’ अशा शब्दांमध्ये सभेचे अध्यक्ष व्ही. शंकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
षण्मुखानंद सभेचे आजमितीला तीन हजारहून अधिक सदस्य आहेत. हे आशियातील सर्वात मोठे सभागृह आहे. या सभागृहाची प्रेक्षक क्षमता तीन हजार आहे. सभेच्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त जगातील सर्व संगीतावर आधारित एक कायमस्वरूपी स्टॅम्प प्रदर्शनी भरविण्यात येणार असून विसाव्या शतकातील प्रमुख संगीतकारांच्या तैलचित्रांची कायमस्वरूपी गॅलरीही सुरू होणार आहे. तिचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होईल. षण्मुखानंद सभागृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्यपालांनी अडीच कोटीची देणगी दिली असून महालक्ष्मी येथे दोन प्रमुख शर्यतींमध्ये बेटिंगचे अधिकार दिले आहेत.
संगीत विद्यालयातून जवळपास २५ हजारहून अधिक विद्यार्थी संगीत शिकले आहेत. वर्षांला सुमारे ५० हजार गरीब आणि गरजू रुग्णांना सभेच्या वैद्यकीय केंद्रातून खास मदत देण्यात येते. संस्थेतर्फे स्वस्त आरोग्य सुविधा पुरविण्यात येतेच, शिवाय स्वस्त दरामध्ये डायलिसिस केंद्र चालविण्यात येते.
वर्षभर अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होणार असून वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या ६०० सदस्यांची षष्ठय़ब्दीपूर्ती केली जाणार आहे. शहरातील शालेय विद्यार्थी, बेघर आणि विशेष मुलांसाठी तीन सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य कार्यक्रम सायंकाळी राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या उपस्थितीत होणार असून चेन्नईतील ख्यातनाम भारत कलांजली संस्थेच्यावतीने भारतातील विविध लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्ये सादर करण्यात येणार आहेत.

Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
devendra fadnavis said maha vikas and india aghadi are break engine public do not trust
इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान