12 December 2017

News Flash

शरद पवार ब्रीच कॅन्डी रूग्णालयात

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सोमवारी रात्री उशीरा ब्रीच

मुंबई | Updated: December 11, 2012 11:40 AM

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सोमवारी रात्री उशीरा ब्रीच कॅन्डी रूग्लालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रूग्णालयातील सूत्रांनी दिली. परंतू त्यांना कशासाठी दाखल करण्यात आले आहे य़ाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार पवार यांना कर्करोगतज्ञ डॉ. सुलतान प्रधान यांच्या दक्षतेखाली ठेवण्यात आले आहे. २०१० साली पवारांवर यांच्या घशावर याच रूग्णालयात शस्त्रक्रीया झाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले कि, पवार नेहमीच्या तपासासाठी रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यापासून ते तेथे तपासणीसाठी नेहमीच जात असतात, असंही पक्षाने नेते पुढे म्हणाले.
पवारांची प्रकृती गेल्या ३-४ महिन्यापासून ठिक नाही. दरम्यान, बुधवारी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पवार समर्थकांना भेटणार नसल्याचे पक्षातर्फे जाहिर करण्यात आले आहे.      

First Published on December 11, 2012 11:40 am

Web Title: sharad pawar admitted to breach candy