राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज्यसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज सादर केला. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पवार यांनी बुधवारी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करुन विधान भवनातून बाहेर पडत असताना विधान भवनाच्या पायऱ्यांवरच त्यांची भेट भाजपाचे आमदार आणि नेते आशीष शेलार यांच्याशी झाली. त्यानंतर दोन्ही नेते पायऱ्यांवर उभे राहून एकमेकांशी बराच वेळ चर्चा करत होते. अधिवेशनानिमित्त विधान भवन परिसरामध्ये असणारे शेलार आणि अर्ज भरायला आलेले पवार एकमेकांशी हसत खेळत बोलत होते. दोघांभोवतीही कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांचा गराडा असल्याचे दिसून आले. यावेळी पायऱ्यांवरुन खाली उतरताना पवारांनी शेलारांचा हात पकडल्याचेही दिसलं. पवार आणि शेलार हसत हसत काहीतरी सांगत असतानाचे चित्र यावेळी दिसले.

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा


दोघांभोवतीची गर्दी वाढत गेल्यामुळे पवारांना शेलारांचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. पवार आणि शेलार एकत्र आल्याने त्यांच्याभोवतीची गर्दी वाढतच चालली होती. कोण काय बोलत आहे हे समजत नव्हता इतका आवाज दोघांच्या आजूबाजूला होऊ लागला. त्यामुळे शेलारांनी पवारांचा निरोप घेतला. मात्र जाता जाता, ‘मी नंतर फोन करतो,’ असं शेलारांनी पवारांना सांगितलं अन् दोन्ही नेते विरुद्ध दिशेला चालू लागले.