20 September 2020

News Flash

शरद पवार रुग्णालयातून घरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर सोमवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले. पवार यांची प्रकृत्ती उत्तम

| December 12, 2012 04:07 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर सोमवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले.
पवार यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे राष्ट्रवादीचे नेते मदन बाफना यांनी सांगितले. प्रख्यात डॉक्टर सुलतान प्रधान यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीही डॉ. प्रधान यांनीच पवार यांच्या तोंडावर शस्त्रक्रिया केली होती. पवार यांना भेटण्यास कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. पवार यांचा बुधवारी वाढदिवस असला तरी ते कोणालाही भेटणार नाहीत, असे पक्षाने स्पष्ट केले.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 4:07 am

Web Title: sharad pawar back from hospital
टॅग Ncp,Sharad Pawar
Next Stories
1 दुरान्तोचे इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत
2 कोहिनूर मिलच्या जागेची मागणी अयोग्य – मनोहर जोशी
3 डिस्कव्हरीवर आजपासून युद्धविषयक मालिका
Just Now!
X