News Flash

‘बाबासाहेबांना हात लागला तर तांडव’

‘याद राखा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रात तांडव करेन’, असा खणखणीत इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिला.

| August 19, 2015 01:55 am

MNS chief Raj Thackeray : शस्त्र परवाने देऊन उपयोग नाही, कायद्याचा धाक हवा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

‘याद राखा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रात तांडव करेन’, असा खणखणीत इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिला. बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार आणि भाजपमधील काही मंत्र्यांचे गलिच्छ राजकारण कारणीभूत असल्याचा आरोपही राज यांनी केला.
पुरंदरे यांना बुधवारी राजभवनात  पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यापासून पद्धतशीरपणे ते ब्राह्मण असल्यामुळे राजकारण सुरु असून बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचा पद्धतशीरपणे शरद पवार यांनी त्याचा वापर केल्याचा आरोप राज यांनी केला. शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी जातीय राजकारणाचे विष कालविण्याचे काम चालविले असून बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा साक्षात्कार आता पन्नास वर्षांनंतर कसा झाला असा सवालही राज यांनी केला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेबांना जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार त्यांचा आदर व्यक्त करतात मग आताच अचानक घुमजाव कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला. शरद पवार यांची फूस असल्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाबासाहेबांना विरोध करण्याची हिम्मत केली, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 1:55 am

Web Title: sharad pawar indulging in dirty politics over award to historian babasaheb purandare says raj thackeray
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 व्हिवा लाउंजमध्ये ‘अमृता’वाणी!
2 मुंबई पोलिसांची आज कसोटी
3 दुष्काळामुळे एसटीचे प्रवासी भारमान आटले
Just Now!
X