शरद पवारांकडे काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुक केले. याच कौतुकाचा संदर्भ घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला आहे. त्यांना आता काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. निवडणुका जवळ येतात तसा राजकीय टोलेबाजीला वेग येतो हे कायमच दिसून येते. त्यामुळेच शरद पवारांवर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काँग्रेसचे वकील म्हटलं आहे.
Interaction with media on #AgustaWestland https://t.co/f3uffHzAyv
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2018
याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसवर निशाणाही साधला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते माधव भंडारी, केशव उपाध्ये, गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. शिवसेनेच्या आरोपांना आम्ही महत्त्व देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशाच्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 5:18 pm