13 November 2019

News Flash

विरोधी पक्षनेते ते मंत्रिपदाचा प्रवास..

शरद पवार, राणे, शिंदे, विखे-पाटील

शरद पवार, राणे, शिंदे, विखे-पाटील

तेराव्या विधानसभेतील एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे-पाटील हे दोन विरोधी पक्षनेते सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आगळावेगळा विक्रम घडला आहे.

विरोधी पक्षनेतेपद भूषविले त्याच सरकारमध्ये सहभागी होण्याची राज्यात नेत्यांची परंपराच आहे. १९८५ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले होते. पवार तेव्हा विरोधी पक्षनेते होते. १९८७ मध्ये पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला आणि १९८८ मध्ये पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २००५मध्ये शिवसेनेच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले. तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व त्यांचा लगेचच मंत्रिमंडळात समावेश झाला.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. पण शिंदे यांचे विरोधी पक्षनेतेपद अल्पकाळ टिकले.

कारण शिवसेनेने भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी झाली. शिंदे हे मंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत मुलाच्या उमेदवारीसाठी भाजपचा आधार घेणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.

First Published on June 17, 2019 12:04 am

Web Title: sharad pawar narayan rane eknath shinde radhakrishna vikhe patil