केंद्रातील मोदी सरकारने यूपीएने केलेल्या भूसंपादन कायद्यात बदल करून कष्टकऱ्यांची जमीन घेण्याचा डाव आखून रस्त्यावर आणले आहे. या कायद्यातील झालेले बदल हे अन्यायकारक असून भाजपने या कायद्यात बदल न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेत त्याला विरोध करेल आणि हा कायदा हाणून पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात  कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. मोदी सरकारने यूपीए सरकारने सत्तेवर असताना तयार केलेल्या कामगार विधेयकात बदल करून केलेला कायदा, माथाडींसाठी केलेल्या कायद्यात बदल, भूसंपादन आणि मुस्लीम आरक्षण कायद्यातील फेरफार हे सर्व बदल अन्यायकारक असल्याची टीका पवार यांनी केली.