मुंबई : मराठा आरक्षण व आरक्षणातील पदोन्नतीवरून राजकारण तापत असताना आणि १ जूननंतर टाळेबंदीसदृश निर्बंध कशा रीतीने शिथिल करायचे यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने काय चर्चा झाली यावरून तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

आरक्षणातील पदोन्नतीच्या विषयावरून शिवसेना व राष्ट्रवादी संयमी भूमिका घेत असताना काँग्रेसमधील नेत्यांचा एक गट आक्रमक झाला आहे. त्यावरून वाद सुरू आहे. गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे पडसाद पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्या पाश्र्वाभूमीवर  पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा के ली. मराठा आरक्षणावरून भाजपने व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून तेही मुंबईत बड्या नेत्यांची भेट घेणार आहेत. याचबरोबर १ जूननंतर राज्यात निर्बंध शिथिल करताना आम्हाला सवलती द्या अशी विविध व्यावसायिकांनी मागणी के ली आहे. तसेच तौक्ते  वादळग्रस्तांना मदतही जाहीर होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवरपवार-ठाकरे भेट झाली आहे.