शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भात नुकताच यवतमाळ जिल्ह्य़ातील पिंपरी बुटी, भांबराजा आणि बोथबोडन या गावांना भेटी देऊन त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतक री कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र लिहून शेतक ऱ्यांच्या समस्यांविषयी माहिती देऊन या गंभीर समस्येची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने आश्वासक कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले असताना त्यांनी यवतमाळ आणि काटोल जिल्ह्य़ातील काही गावांना भेटी देऊन शेतक ऱ्यांशी संवाद साधला. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतीमालास योग्य बाजारभावाचा अभाव, या बाबी त्यांच्या दौऱ्यानिमित्त निदर्शनास आल्या. शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हे एक महत्त्वाचे कारण आहे. आघाडी सरकारच्या काळात कर्जबाजारी शेतक ऱ्यांची ७१ कोटी रुपयांची कर्ज माफ करण्यात आलेली असताना राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घेऊन कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतक ऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने शेतक ऱ्यांचे पीक गेले व नापिकीमुळे चालू कर्जाची भविष्यातील परतफेड करण्याची शेतक ऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही. शेतीवर अवलंबून असणाऱ्या भूमिहिन शेतमजूरांच्या आत्महत्यांबाबत तर काहीच तरतूद नाही. अपात्रतेच्या निकषांबाबत फेरविचार करून काही वस्तूनिष्ठ प्रकरणांना न्याय देता येईल का, या दृष्टीने विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. या भेटीचा उद्देश शेतक ऱ्यांशी संवाद साधून शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नांची कारणमीमांसा करणे व त्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना शोधणे, हा होता. त्यामुळे या शेतक ऱ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी, अशीही मागणी त्यांनी पत्रात केली.