गेली साडेपाच दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ हे राजकीय आत्मचरित्र राजहंस प्रकाशन प्रकाशित करणार आहे, अशी घोषणा राजहंस प्रकाशनाचे संपादक सदानंद बोरसे यांनी बुधवारी केली.
१० डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे ‘सांगाती’चे प्रकाशन होणार असून ४०० पानांच्या या पुस्तकात २५ ते ३० पाने छायाचित्रांची आहेत. या छायाचित्रांचे बारामती ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, लोक माझे सांगाती, विश्व नागरिक असे चार टप्पे असून त्याच आधारे पुस्तकाची मांडणी केली आहे. पुस्तकाचे लेखन स्वत: पवार यांनी केले असून गेले दहा ते १२ महिने ही प्रक्रिया सुरू होती. पवार यांनी यात नेत्यांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 3, 2015 4:58 am