लोकप्रतिनिधीपदाची कवचकुंडले अंगावर बाळगून सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उगारणारे आमदार बच्चू कडू हे काही पहिलेच नाहीत आणि ही व्यवस्था अशीच लेचीपेची राहिली तर शेवटचेही असणार नाहीत.

मनगटशाही म्हणजेच पुरुषार्थ असे वाटण्यास खतपाणी घालणारे असे राजकारणी आसपास असतील तर अशा समाजात सभ्य असणे हे मागासलेपणाचेच समजले जाणार, यावर सडेतोड भूमिका मांडणाऱ्या ‘अगदीच बच्चू’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉगबेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

वैचारिक निबंधलेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा दहावा लेख आहे.