शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर बोचऱ्या शब्दांत टीका करणाऱ्या ‘लोकसत्ता’मधील ‘नालायकांचे सोबती’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
राज्याच्या सत्तेत भारतीय जनता पक्षासोबत भागीदारी करतानाच सरकारवरील टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. मात्र, ज्या सरकारला ते आपल्या भाषणांमधून नालायक ठरवितात त्याच सरकारमध्ये आपलेही मावळे आहेत, हे ते विसरतात. ११ एप्रिलला प्रकाशित झालेल्या या अग्रलेखात नेमक्या या विरोधाभासावर बोट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या अग्रलेखावर ब्लॉग बेंचर्समध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.
या करिता ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक संतोष प्रधान आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांनीही आपली भूमिका स्वतंत्रपणे मांडली आहे. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

लक्षात ठेवावे असे..
* प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपली भूमीका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल. सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.