देवनार कचराभूमीचा प्रश्न सोडवता येण्यासारखा असूनदेखील तो सत्ताधारी व प्रशासनाकडून सुटत नाही यावर ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा प्रश्न सुटत नसल्याने मला लाज वाटते, असे विधान केले. काकोडकर यांच्यासारख्यांना असे जाहीर विधान करावेसे वाटते यावरून देवनार प्रश्नासह देशातील अन्य समस्या या किती निंदनीय आहेत यावर ‘लोकसत्ता’च्या ‘माझ्या मना बन दगड’ अग्रलेखावर उपरोधिकपणे भूमिका मांडण्यात आली आहे. काकोडकरांसारख्या वरिष्ठांना अशा अजून किती घटनांची लाज वाटावी याचा समाचार या अग्रलेखात घेण्यात आला आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात पुढच्या गुरुवापर्यंत ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या विषयावर ‘लोकसत्ता’ने आयआयटी मुंबईतील पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रातील प्राध्यापक श्याम असोलेकर व ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक अभिजीत ताम्हणे यांना बोलते केले आहे. त्यांनी मांडलेल्या मतांचा विद्यार्थ्यांना आपले मत मांडताना उपयोग होणार
आहे. सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.