18 January 2018

News Flash

‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर लिहिते व्हा..

मासोंदा ओलिव्हिए या आफ्रिकी तरूणाची राजधानी दिल्लीत जमावाकडून हत्या झाली.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: June 4, 2016 2:00 AM

भारतासारख्या देशात गोरेपणा हा विशेष गुण मानला जातो त्यामुळे देशात आफ्रिकी नागरिकांवर केवळ त्यांच्या कातडीच्या रंगावरून हल्ले होणार असतील तर त्याचे आश्चर्य वाटायचे अजिबात कारण नाही. मासोंदा ओलिव्हिए या आफ्रिकी तरूणाची राजधानी दिल्लीत जमावाकडून हत्या झाली. नंतरच्या तपासात हा वर्णभेदाचा प्रकार नाही अशी सारवासारव होत असली तरी मासोंदाच्या त्वचेचा रंग काळा होता हे त्याला मारहाण करण्याचे कारण निश्चितच आहे. भारतातील वर्णभेदाचे हे वास्तव मांडणाऱ्या ‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपले मांडायचे आहे.
पुढच्या गुरूवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक राहूल बनसोडे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

First Published on June 4, 2016 1:56 am

Web Title: share your opinion on loksatta blog benchers 44
  1. No Comments.