‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मधील दुकानांत आज उपस्थिती

मुंबई : खरेदीबरोबर बक्षिसाचा दुहेरी आनंद मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या पाचव्या पर्वात लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सहभागी होणार आहे. शुक्रवारी (१८ जानेवारी) ती काही दुकानांना भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधेल.

‘कलर्स’ वाहिनीवरील ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत ‘संयोगिता’ हे पात्र रंगविणारी शर्मिष्ठा थोडय़ाच काळात घराघरांत पोहोचली आहे. ‘पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स’, ‘राणेज पैठणी’, ‘अंग्रेजी ढाबा’ या दुकानांना ती भेट देईल.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, गिफ्ट कूपन, एसी, ओव्हन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत. महोत्सवाच्या अखेरीस पहिल्या भाग्यवान विजेत्याला ‘केसरी टुर्स’कडून सहलीचे पॅकेज दिले जाणार आहेत. हा महोत्सव १६ जानेवारीपासून सुरू झाला असून बृहन्मुंबई परिसरातील अनेक शोरूम्सनी भाग घेतला आहे. २७ जानेवारीपर्यंत हा खरेदी महोत्सव सुरू राहणार आहे.

‘रिजेन्सी’ समूह प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘वास्तुरविराज’ आणि ‘पितांबरी’ पावर्ड बाय पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे या फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर आहेत. ‘एम.व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसळुणकर अँड सन्स ज्वेलर्स प्रा.लि.’, ‘नम्रता ज्वेलर्स’, ‘मे. पांडुरंग हरी वैद्य अँड सन्स ज्वेलर्स’, ‘उज्ज्वल तारा’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत.

याशिवाय ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत. फूड अँड बेवरेजेज पार्टनर ‘अंग्रेजी ढाबा’, ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स’, एंटरटेन्मेंट पार्टनर ‘एनडीज फिल्म वर्ल्ड’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘लँडमार्क मर्सिडीज’ आहेत. या महोत्सवात सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या दुकानदारांनी नमिता खांडभोर यांच्याशी ८१०८३८८१२२ या आणि निक्षित राठोड यांच्याशी ९८२०५५१२५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धेचे स्वरूप

’ लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेची तसेच दागिन्यांच्या दुकानांमधून ३००० रुपयांहून अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एका बिलावर एक कूपन दिले जाईल.

’  ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

’  अर्धवट माहिती भरलेले कूपन स्वीकारले जाणार नाही.

’ ड्रॉप बॉक्समध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध क रण्यात येतील.

’  अटी-शर्ती लागू आहेत.