गणेशोत्सवासाठी कोकणात जाणऱयांना बाप्पा पावला आहे. गणेशोत्सवानिमित्त एसी डबलडेकर एक्स्प्रेसच्या २० फेऱया लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी (गोवा) या दरम्यान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मध्यरेल्वेने केली आहे. तसेच एक दिवसाआड शताब्दी प्रिमियम स्पेशल गाड्याही सोडण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, खिडक्यांवर रांगा लावून प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून या गाड्यांचे आरक्षण केवळ ऑनलाईन होणार आहे तसेच ऑनलाईन आरक्षणाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी सांगितले आहे.

* एसी डबलडेकर एक्स्प्रेसचे वेळापत्रक
मुंबई ते करमाळी (गोवा)
लोकमान्य टिळक टर्मिनसहून २२, २४, २६, २८, ३० ऑगस्ट तसेच १, ३, ५, ७, ९ सप्टेंबर रोजी डबलडेकर एक्स्प्रेस सुटणार आहे. सकाळी ५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटून ही गाडी त्याचदिवशी सायंकाळी ४.३० वाजता करमाळी येथे पोहोचेल.

– करमाळी(गोवा) ते मुंबई
करमाळीहून ही गाडी २३, २५, २७, २९, ३१ ऑगस्ट तसेच २, ४, ६, ८, १० सप्टेंबर या तारखांना उपलब्ध असणार आहे. ही गाडी सकाळी ६ वाजता करमाळी येथून सुटून लोकमान्य टिळक टर्मिनसला सायंकाळी ५.४० वाजता पोहोचणार आहे.

* शताब्दी प्रिमियम स्पेशलचे वेळापत्रक:
– सीएसटी ते करमाळी (गोवा)
गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून २३, २५, २७, २९, ३१ ऑगस्ट तसेच २, ४, ६, ८, १० सप्टेंबर या तारखांना शताब्दी प्रमियम एक्स्प्रेस सुटणार आहे. पहाटे ५ वाजता सीएसटीहून सुटणारी ही गाडी त्याचदिवशी सायंकाळी ४. ३० वाजता करमाळी येथे पोहोचणार आहे.

– करमाळी(गोवा) ते सीएसटी
ही गाडी करमाळी येथून २४, २६, २८, ३० ऑगस्ट तसेच १, ३, ५, ७, ९, ११ सप्टेंबर यादिवशी उपलब्ध असणार आहे. ही गाडी सकाळी सहा वाजता करमाळी येथून सुटून