मालाड परिसरात चोरीच्या संशयावरून दोन तरुणांचे मुंडण करून अर्धनग्न अवस्थेत मिरवणूक काढल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. रवींद्र दुलगत (३२), राहुल बिडलान (२३), रोहित कागडा (२६), योगेश टाक (१९), विजय दुळकंच (२४) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित तरुणांनी चोरी केल्याचा संशय रवींद्र याला होता. त्यामुळे कांदिवली येथील लालजी पाडा भागातून रवींद्र याने या दोघांना पकडले व मालाड येथील काचपाडा भागातआणले. या वेळी जमावाने त्यांना मारहाण केली. तसेच त्यांनी तरुणांचे मुंडण केल व वाजंत्री पथकासह या तरुणांची मिरवणूक काढली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची चित्रफीत आरोपींनी समाजमाध्यमातून प्रसारित केली. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणी आरोपींविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 12:01 am