News Flash

शीना बोरा हत्याप्रकरण: पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

महानगरदंडाधिकाऱयांनी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ

पीटर मुखर्जी.

शीना बोरा हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जी याच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. मुंबई महानगरदंडाधिकाऱयांनी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ केली. पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी संपल्यावर त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआयने पीटरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची विनंती केली व न्यायालायने ११ जानेवारीपर्यंत पीटरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.
१९ ऑक्टोबर रोजी पीटरला सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्याला चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले. पीटरच्या चौकशीतून त्याने इंद्राणीच्या साथीने परदेशात ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे उघड झाले होते. शिवाय इंद्राणीने शीनाच्या नावे हाँगकाँगमध्ये खाते उघडले होते, हेही पुढे आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 2:54 pm

Web Title: sheena bora case peter mukerjeas judicial custody extended till january 11
टॅग : Sheena Bora
Next Stories
1 सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील चारही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
2 मुंबई पोलिसांचे ‘ट्विटर’वर पदार्पण
3 नेहरूंनी पटेलांचे ऐकले असते तर काश्मीरचा प्रश्न उदभवलाच नसता – काँग्रेसच्या मुखपत्रात दावा
Just Now!
X