News Flash

 ‘शीना हत्येचा तपास  १७ डिसेंबपर्यंत पूर्ण करा’

शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास दहा दिवसांत म्हणजेच १७ डिसेंबपर्यंत पूर्ण करा,

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास दहा दिवसांत म्हणजेच १७ डिसेंबपर्यंत पूर्ण करा, असे आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी ‘सीबीआय’ला दिले. त्याच वेळेस प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि माजी चालक श्यामवर राय यांची पुन्हा चौकशी करण्यासही न्यायालयाने ‘सीबीआय’ला हिरवा कंदील दाखवला आहे.इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी याला अटक करण्यात आल्यानंतर जी माहिती पुढे आली आहे, तसेच दूरध्वनीवरील संभाषणाबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही उपलब्ध झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 12:03 am

Web Title: sheena bora murder case court asks cbi to complete probe by 17 december
Next Stories
1 मुंबईचा पारा घसरला
2 दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
3 मुंबईच्या लोकलमध्ये मेट्रोप्रमाणे आसनव्यवस्था?
Just Now!
X