News Flash

शीना बोरा हत्या : संजीव खन्नाला न्यायालयीन कोठडी

इंद्राणी मुखर्जी, श्याम राय यांना यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी संजीव खन्ना याला मंगळवारी वांद्रे न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या खटल्यातील अन्य प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा वाहनचालक श्याम राय यांना सोमवारीच न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
संजीव खन्ना याला पोलीसांनी बेकायदा अटक केली असून, त्याला तातडीने सोडून द्यावे, असा अर्ज संजीव खन्नाचे वकील श्रेयंश मिठारे यांनी न्यायालयाकडे केला आहे. संजीव खन्ना याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारीच संपली होती. त्यामुळे पोलीसांनी त्याला कालच न्यायालयापुढे हजर करायला हवे होते. मात्र, तसे न करता पोलीस त्याला कोलकात्याला घेऊन गेले. हे एकप्रकारे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे संजीव खन्ना याला पोलीसांच्या ताब्यात ठेवणे बेकायदा ठरते, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायाधीश जी. आर. तौर यांनी खार पोलीसांकडून याप्रकरणी अहवाल मागविला. तो आल्यावर १० सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 4:48 pm

Web Title: sheena case khanna remanded in judicial custody till sept 21
Next Stories
1 मुंबई झाली ‘बॅनि’स्तान, मांस बंदीवर ट्विटरकरांचा संताप
2 अहमद जावेद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, राकेश मारिया होमगार्डचे महासंचालक
3 मुंबईतील सर्वात महागडा बंगला कोणाचा?
Just Now!
X