अमेरिकोस्थित पंढरपूरकर तरुणीचा उपक्रम

मुंबई : अमेरिकेत राहात असली तरी जन्म पंढरपूरमध्ये झालेला असलेल्या शीतल सराटे हिची विठ्ठलाची ओढ काही सुटली नाही. ती गेली दोन वर्षे कला आणि भक्ती यांची सांगड घालत ऑनलाइन व्यासपीठावर आषाढी एकादशी साजरी करत आहे. संतांनी विठ्ठलाची भक्ती करताना रचलेले अभंग अक्षरकलेतून सादर करण्याचे शीतलचे हे तिसरे वर्ष आहे. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय शीतल साकारत असलेली अक्षरकला कौतुकाचा विषय ठरत आहे.

UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
168 th prakat din, Shri Swami Samarth Maharaj, Celebrated with Devotion, bhakts, akkalkot, marathi news,
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी
What is the total wealth of NCP candidate Amar Kale
“असावे घरकुल ठिकठिकाणी”, अमर काळे यांच्या संपत्तीचे विवरण असे…
Student arfat abdul mohammad
अमेरिकेतून भारतीय विद्यार्थी बेपत्ता; खंडणीचे कॉल, किडनी विकायची धमकी

आजी-आजोबांच्या तोंडून अभंग ऐकत शीतल पंढरपुरात लहानाची मोठी झाली. त्यामुळे आपोआपच संतसाहित्य वाचनाची तिला आवड आहे. वडिलांकडून शीतलला चित्रकलेचा वारसा मिळाला. शिवाय हस्ताक्षरही सुंदर होते. शाळेत असताना शीतल विविध स्पर्धामध्ये बक्षिसे मिळवणाऱ्या आपल्या वर्गमित्रांसाठी अभिनंदनाचे फलक तयार करायची. तिने कधीही चित्रकलेचे औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही. चित्रफिती पाहून तिने आपली कला विकसित के ली. आयटी क्षेत्रात काम करू लागल्यापासून शीतलची चित्रकलेची पर्यायाने अक्षरकलेची आवड शनिवार-रविवारपुरतीच मर्यादित राहिली. पण त्यानंतर सुलेखनकार अच्युत पालव यांच्या ‘काना, मात्रा, वेलांटी कित्ता’ प्रकाशनाचा सोहळा पाहिल्यानंतर शीतलमधील अक्षरकलाकार पुन्हा एकदा जागी झाली.

संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, मुक्ताई, कान्होपात्रा यांचे काही अभंग शीतल निवडते. त्याबाबत कु टुंबीयांसोबत चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घेते. नक्षी आणि अक्षरकलेच्या एकत्रित कच्च्या कलाकृती प्रोक्रिएट अ‍ॅपवर तयार करते. त्यातील जे सर्वोत्तम वाटेल ते कागदावर उतरवते. शीतलने ट्विटर, इन्स्टाग्रामवर ‘अक्षरकलावारी’ हॅशटॅगसह सादर के लेल्या अभंगांच्या अक्षरकलाकृतींना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘आषाढी-संतकाव्याचा अनोखा रंग’

आषाढी एकादशीच्या निमित्ताने एरव्ही मंदिरांमध्ये आणि पंढरपुरातील रस्त्यांवर ऐकू  येणारा टाळ-मृदुंगाचा गजर यंदा ऑनलाइन दुमदुमणार आहे. योजना प्रतिष्ठानने १ जुलैला सकाळी १०.३० वाजता ‘वैभव महाराष्ट्राचे’ या यूटय़ूब वाहिनीवर ‘डिजिटल अभंगवाणी’ कार्यक्रम आयोजित के ला आहे. याची संकल्पना, संहिता आणि स्वर गायिका योजना शिवानंद यांचा आहे. तसेच त्यांची शिष्या सानिका देवधर काही रचना गाणार आहे. यावेळी ग्रंथाली प्रकाशनातर्फे  ‘आषाढी-संतकाव्याचा अनोखा रंग’ हे योजना शिवानंद यांच्या अभंगवाणी संहिता लेखनाचे छापील पुस्तक आणि ई-बुक अ‍ॅड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशित के ले जाणार आहे.

अभंग मैफल

पंचम निषाद संस्थेने ‘बोलावा विठ्ठल’ ही अभंग मैफल ऑनलाइन आयोजित के ली आहे. यात गायिका रजनी-गायत्री या भगिनी आणि गायक जयतीर्थ मेवुंडी सहभागी होणार आहेत. १ जुलैला रात्री ८.३० वाजल्यापासून  https://in.bookmyshow.com/events/bolava-vitthal-an-evening-of-abhangs/ET00133580  या लिंकवर ही मैफल पाहता येईल. यासाठी २०० रुपये अधिक जीएसटी शुल्क लागू आहे.