News Flash

शिंदेंनी हिंदू समाज आणि सुरक्षा दलाची माफी मागावी – मनमोहन वैद्य

भाजप व संघांच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कडाडून टीका केली आहे. शिंदे यांचा आरोप

| January 22, 2013 06:13 am

भाजप व संघांच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कडाडून टीका केली आहे. शिंदे यांचा आरोप पूर्णपणे खोटा, निराधार व बेजवाबदार असून त्यांचे विधान राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टिका संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केली.
दहशतवादाला हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असे संबोधन वापरून कॉंग्रेस आणि शिंदे यांनी शांतीप्रिय हिंदू समाज आणि भारताच्या सन्यासी परंपरेचा अपमान केला आहे. या विधानांमुळे भारतीय सुरक्षा दलाचे मनोबल खचू शकते त्यामुळे कॉंग्रेस आणि शिंदेंनी हिंदू समाज आणि सुरक्षा दलाची माफी मागावी अशी वैद्य यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये हिंदू दहशतवादाला प्रोत्साहन मिळत असल्याचे वक्तव्य गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्यानंतर गेले दोन दिवस त्यावर विविध स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 6:13 am

Web Title: shinde must apologise hindu community and defence manmohan vaidya
टॅग : Rss,Sushilkumar Shinde
Next Stories
1 ‘आम्ही स्त्रिया, आमची सुरक्षितता’ विषयावर रुईया महाविद्यालयात परिसंवाद
2 मुंबईसाठी स्वतंत्र ‘सीआरझेड’?
3 राहुल हा नापासांच्या शाळेचा नवा मॉनिटर!
Just Now!
X