08 July 2020

News Flash

“ज्याच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराज भिनले..”, शिवजयंतीला राज ठाकरेंचा खास संदेश

मनसेच्या ट्विटमध्ये शिवजी महाराजांच्या थोरवी सांगणाऱ्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त जनतेला खास संदेशही दिला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटरवरून राज ठाकरे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. मनसेच्या ट्विटमध्ये शिवजी महाराजांच्या थोरवी सांगणाऱ्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याखाली राज ठाकरे यांचा भाषण करतानाचा फोटो आहे. त्या फोटोवर राज ठाकरेंचे विचार मांडण्यात आले आहेत.

शिवाजी महाराजांची थोरवी सांगणाऱ्या ओळी –
निश्चयाचा महामेरु । बहुत जनासी आधारु ॥
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ॥
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायी ॥
#शिवकल्याणराजा #शिवछत्रपती

राज ठाकरेंचे विचार
“ज्याच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराज भिनले असतील तो माणूस जातीपातीचा विचार कधीच करू शकणार नाही.”

आज देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. महाजारांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून शिवजंयतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 4:05 pm

Web Title: shiv jayanti 2020 mns raj thackeray taking shiv jayanti nck 90
Next Stories
1 शिवजयंती विशेष: तुम्हाला ‘चर्चगेट’ आणि शिवाजी महाराजांचे कनेक्शन ठाऊक आहे का?
2 VIDEO : शिवाजी महाराज होते म्हणून घडली आधुनिक मुंबई
3 इमारतीवरून उडी घेऊन हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या
Just Now!
X