News Flash

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद

नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा ठराव  सिडकोच्या संचालक मंडळाने १७ एप्रिल रोजी मंजूर केला आहे. 

सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यातून पाठपुरावा सुरू आहे.

शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यावर सरकार ठाम, विरोधकांचे आज आंदोलन

मुंबई: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही.  आपल्या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने ते उद्या, गुरुवारी रायगडमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा ठराव  सिडकोच्या संचालक मंडळाने १७ एप्रिल रोजी मंजूर केला आहे.  त्यानुसार राज्यंत्रिमंडळळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देत तो केंद्राला पाठविला जाणार आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यातून पाठपुरावा सुरू आहे. सिडकोच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची घोषणा स्थानिकांनी केल्यांतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कृती समितीला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते.

त्यावेळी विमानतळास ठाकरे यांचेच नाव देण्याचा निर्णय झाला असून दि.बा. पाटील यांच्याबाबतही सरकारला आदर आहे. त्यामुळे त्यांच्या नावाबाबतचा अन्य प्रस्ताव द्यावा. सरकार त्याचा नक्की विचार करेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी समितीची समजूत काढण्याचा प्रयत्न के ला. मात्र विमानतळास दि.बा यांचेच नाव द्यावे अन्यथा आंदोलन  छेडले जाईल अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकू र व अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. आम्ही भूमिके वर ठाम असून उद्या सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल- बेलापूर,नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.तर २४ जून रोजी सिडकोला घेराव घालण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:59 am

Web Title: shiv sena chief balasaheb thackeray dispute over naming of navi mumbai airport akp 94
Next Stories
1 केंदाचा नवा भाडेकरू कायदा राज्यात लागू करू नये!
2 निर्णय विलंबामुळे अनेकांचे बळी
3 तटरक्षक पश्चिम क्षेत्राच्या प्रमुखपदी शिवमणी
Just Now!
X