11 August 2020

News Flash

उद्धव ठाकरे ‘रूटीन चेकअप’साठी लिलावती रुग्णालयात

कृती ठणठणीत आहे आणि दुपारनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल

लिलावती रुग्णालयाकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील लिलावती रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल झाले आहेत. लिलावती रुग्णालयाकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत निवेदन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे ‘रूटीन चेकअप’साठी बुधवारी रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल समाधानकारक आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे आणि दुपारनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असेही रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
२०१२ साली उद्धव ठाकरे यांची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तसेच त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर खुद्द राज यांनीच उद्धव यांना घरी आणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 2:17 pm

Web Title: shiv sena chief uddhav thackeray admitted to lilavati hospital
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 शीनाची गळा दाबून हत्या, माफीचा साक्षीदार होण्याची श्यामवर रायची विनंती
2 तावडेंच्या राजीनाम्याची मागणी
3 ..तर दिलासा शक्य!
Just Now!
X