22 October 2019

News Flash

भाजपानं खरं बोलायला शिकावं, शिवसेनेचा खोचक सल्ला

अतिरेक्यांना सहानुभूती दाखवणाऱ्यांशी स्वखुशीने सोबत करायची व लफडे अंगाशी येताच ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ ही भूमिका घ्यायची, असा टोला भाजपाला लगावला.

अतिरेक्यांना सहानुभूती दाखवणाऱ्या एका पक्षाशी स्वखुशीने सोबत करायची व लफडे अंगाशी येताच ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ ही भूमिका घ्यायची, असा टोलाही भाजपाला लगावला.

शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर तोंडसुख घेतले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन वर्षे सत्ता भोगल्यानंतर भाजपाने अचानक पीडीपीचा पाठिंबा काढला. त्यामुळे तिथे राज्यपाल राजवट लागू झाली आहे. तोच मुद्दा धरत शिवसेनेने अमित शाह यांच्यासह भाजपावरही टीका केली आहे. भाजपाने मुखवटा उतरवला असून निवडणुकांचे राजकारण सुरू केल्याचा आरोप करत पीडीपीबरोबरचा भाजपाचा स्वैराचार सुरू होता. पीडीपीबरोबर सत्ताशय्या केली पण त्यांनी जबाबदारी स्वीकारला नाही. ३७० कलमापासून ते एक देश एक निशाण या मूळ अजेंड्यास स्पर्श केला नाही. पण सत्तेवरून पायउतार होताच त्यांनी याबाबत बोलण्यास सुरूवात केली आहे. लोकांना आता या बनवाबनवीचा वैताग आला असून भाजपाला कुणी तरी खरे बोलण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अतिरेक्यांना सहानुभूती दाखवणाऱ्या एका पक्षाशी स्वखुशीने सोबत करायची व लफडे अंगाशी येताच ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ ही भूमिका घ्यायची, अशा शब्दांत भाजपाला टोलाही लगावला.

पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये शिवसेनेने जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीला पीडीपीबरोबरच भाजपा जबाबदार असल्याचे म्हटले. भाजपाने सत्ता हाती येऊनही काही केले नाही. आता पुन्हा त्याच मुद्यांवरून काश्मीरात वातावरण निर्माण करून पुन्हा तोच खेळ सुरू झाला आहे. तीन वर्षे पीडीपीबरोबर गादी उबवल्यावर सरकार काम करत नव्हते. त्यांच्याशी जमत नव्हते. दहशतवाद वाढला आहे, विकासकामांकडे सरकारचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत हे सरकार पाडले. अमित शाहंनी येथील परिस्थितीस मेहबूबा मुफ़्ती यांनाच जबाबदार धरले आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेला उपमुख्यमंत्री नाकारणाऱ्या भाजपाने जम्मू-काश्मीरात उपमुख्यमंत्रिपदासह अनेक महत्वाची खाती पटकावली होती. मेहबूबा मुफ्तींनी तर आता सत्तेत असताना जे निर्णय घेतले ते भाजपा नेत्यांच्या संमतीनेच केल्याचे जाहीर केले आहे. कलम ३७० असो किंवा लष्करावर दगडफेक करणाऱ्या युवकांविरोधात गुन्हे मागे घेण्याचा निर्णय असो, हे सर्व भाजपाच्या संमतीनेच झाले. रमजानच्या महिन्यातील शस्त्रसंधीचा निर्णय भाजपाशी बोलूनच घेतला. त्यामुळे भाजपा आता पळ का काढत आहे? असा सवालच मुफ्ती यांनी केला आहे.

भाजप मंत्र्यांनी केंद्र किंवा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा कधीच समोर का आणला नाही, असा सवाल करत बुरहान वाणीसारख्या अतिरेक्याचा खात्मा लष्कराने करताच त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी तिजोरीतून भरपाई देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही भाजपा मंत्र्यांनी विरोध दर्शवला नाही. अतिरेक्यांना सहानुभूती दाखवणाऱ्या एका पक्षाशी स्वखुशीने सोबत करायची व लफडे अंगाशी येताच ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ ही भूमिका घ्यायची. तसे कश्मीर प्रकरणात भाजपाने केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.

First Published on June 26, 2018 5:31 am

Web Title: shiv sena chief uddhav thackeray slams on bjp amit shah on pull back support of jammu and kashmir pdp alliance
टॅग Bjp,Shiv Sena