मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेत्याचं करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मिरा भाईंदर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवकाची पत्नी आणि आईलाही करोनची लागण झाली असून त्यांवर उपचार सुरु आहेत.