23 November 2019

News Flash

दुकानातील अंतर्वस्त्राचे पुतळे हटवा, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंचा आदेश

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दुकानातील बेकायद अंतर्वस्त्राचे पुतळे हटवण्याचे आदेश दिले आहेत.

संग्रहित छायाचित्र

मुंबई महानगर पालिकेतील कायदा समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दुकानातील बेकायद अंतर्वस्त्राचे पुतळे हटवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाला हा आदेश देताना कोणीही नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास परवाना रद्द करण्यासही सांगितले आहे.

अंतर्वस्त्राची जाहीरात करण्यासाठी या पुतळयाचा वापर केला जातो. महिलांच्या कपडयांची विक्री करणाऱ्या अनेक दुकानांबाहेर अंतर्वस्त्राची जाहीरात करण्यासाठी असे पुतळे उभे केलेले असतात.

भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे २०१३ पासून अंतर्वस्त्राच्या या मॅनीक्वीन्स विरोधात आवाज उठवत आहेत. महापालिकेच्या आदेशामुळे अंतर्वस्त्राचे अशा प्रकारचे प्रदर्शन आता बंद होईल.

First Published on June 18, 2019 8:13 pm

Web Title: shiv sena corporator sheetal mhatre ordered bmc admn to remove illegal lingerie mannequins dmp 82
Just Now!
X