Shiv Sena Dasara Melava 2018 : सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यात विविध मुद्द्यांवरुन शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपली भुमिका स्पष्ट केली. राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारवर यावेळी त्यांनी तोफ डागली. महागाई, महिला अत्याचार कमी कसे होत नाही असा खडा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, राम मंदिर उभारण्याची आठवण करुन देण्यासाठी आपण २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाऊन सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आणि इथं विचारले तेच प्रश्न तिथं मोदींना विचारणार, आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनेशी केळू नका. त्यांच्या आशेवर पाणी पडलंच तर त्याचा लाव्हा व्हायला आणि त्यात तुम्ही भस्म व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा उद्धव यांनी दिला.

तसेच त्यांनी यावेळी पाकिस्तानवरूनही केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, सतत वल्लभभाई पटेलांचं नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता, पाकिस्तानचे तुकडे करण्याऐवजी फक्त सोईचं राजकारण करता आहात. जर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता.

Live Blog

Highlights

  • 20:27 (IST)

    अन्याय झालेल्या महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं

    एका रात्रीत तुम्ही कशाचाही दरवाढ करता मात्र, तुम्हाला शेतकऱ्यांचे काही देणं घेणं वाटत नाही. à¤¦à¤°à¤µà¤¾à¤¢ करुन केलेल्या लुटमारीचा पैसा माझ्या शेतकऱ्यांना द्या. महिलांवरील अत्याचांमध्ये वाढ झाली असून आरोपींना अद्याप शिक्षा का होत नाही. जर महिलांवर अत्याचार झाला तर मीटू करीत रहायचं नाही खाडकनं कानाखाली द्यायची. गरज पडल्यास शिवसेनेकडे या आम्ही आहोत. देशानं शिवरायांच्या महाराष्ट्राचा आदर्श घेतला पाहिजे.

  • 20:14 (IST)

    २५ नोव्हेंबरला अयोद्धेला जाणार - उद्धव ठाकरे

    संघाच्या दसरा मेळाव्यात मोहन भागवंतांनी राम मंदिर उभारण्याबाबत शिवसेनेसारखा विचार मांडल्याने त्यांचे अभिनंदन करतो. एक तर राम मंदिर बांधा नाहीतर जाहीर करा की राम मंदिर २५ नोव्हेंबरला अयोद्धेला जाणार आणि इथं विचारले तेच प्रश्न तिथं मोदींना विचारणार. आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनेशी केळू नका. त्यांच्या आशेवर पाणी जरी पडलं तरी तुमचं आसन कधी जळून खाक होईल सांगता येत नाही. माझ्या देशाचा पंतप्रधान एकादीह अयोध्येत का गेला नाही? 

  • 19:54 (IST)

    २०१४ सालची हवा आता राहिलेली नाही - उद्धव ठाकरे

    भाजपाला सत्तेत बसवण्यात संघाचा हात होता. त्यामुळे संघाने त्यांना विचारायला हवं की तुम्ही सत्तेत का बसलात. बकरी झालेले कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसैनिकांत आहे. हवामानावर बोलायचं झाल्यास २०१४ सालची हवा आता राहिलेली नाही. तुम्हाला सर्वांना घेऊन मी जी टक्कर दिली होती. दुष्काळाबाबत राज्यात आणि केंद्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धमक का दाखवू शकत नाहीत. 

20:30 (IST)18 Oct 2018
२०१९मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे

२०१९च्या निवडणुकीत जर तुम्हाला सध्याची परिस्थीती नको असेल तर शिवसेनेला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. तुमची साथ असेल तर २०१९मध्ये दिल्लीवर भगवा फडवल्याशिवाय राहणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी दिला. 

Caption
20:27 (IST)18 Oct 2018
अन्याय झालेल्या महिलांनी मीटू करण्याऐवजी शिवसेनेकडं यावं

एका रात्रीत तुम्ही कशाचाही दरवाढ करता मात्र, तुम्हाला शेतकऱ्यांचे काही देणं घेणं वाटत नाही. à¤¦à¤°à¤µà¤¾à¤¢ करुन केलेल्या लुटमारीचा पैसा माझ्या शेतकऱ्यांना द्या. महिलांवरील अत्याचांमध्ये वाढ झाली असून आरोपींना अद्याप शिक्षा का होत नाही. जर महिलांवर अत्याचार झाला तर मीटू करीत रहायचं नाही खाडकनं कानाखाली द्यायची. गरज पडल्यास शिवसेनेकडे या आम्ही आहोत. देशानं शिवरायांच्या महाराष्ट्राचा आदर्श घेतला पाहिजे.

20:20 (IST)18 Oct 2018
तुमच्यानं जमणार नसेल तर राम मंदिर शिवसेना बांधेल - उद्धव ठाकरे

तुमच्याकडून जर राम मंदिर बांधायला सुरुवात झाली नाही तर आम्ही ते बांधू. आम्ही टीका सहन करतोय ती केवळ हिंदुत्वासाठी तुमचे चोचले पुरवण्यासाठी नाही. आपल्याकडे सत्ता असतानाही काही करु शकत नाही याची खंत. पाकिस्तानला आपण उत्तर का देऊ शकत नाही. पाकिस्तान अतिरेकी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत आम्ही क्रिकेटही खेळणार नाही असं सांगितलं मात्र त्याच काय झाल?

20:14 (IST)18 Oct 2018
२५ नोव्हेंबरला अयोद्धेला जाणार - उद्धव ठाकरे

संघाच्या दसरा मेळाव्यात मोहन भागवंतांनी राम मंदिर उभारण्याबाबत शिवसेनेसारखा विचार मांडल्याने त्यांचे अभिनंदन करतो. एक तर राम मंदिर बांधा नाहीतर जाहीर करा की राम मंदिर २५ नोव्हेंबरला अयोद्धेला जाणार आणि इथं विचारले तेच प्रश्न तिथं मोदींना विचारणार. आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनेशी केळू नका. त्यांच्या आशेवर पाणी जरी पडलं तरी तुमचं आसन कधी जळून खाक होईल सांगता येत नाही. माझ्या देशाचा पंतप्रधान एकादीह अयोध्येत का गेला नाही? 

20:09 (IST)18 Oct 2018
'विष्णूचा अकरावा अवतार असताना तुम्हाला महागाई का रोखता येत नाही'

तुम्हाला महागाई रोखता येत नाही, महिलांवरील अत्याचार रोखता येत नाहीत, मग तुम्ही नक्की करता काय? à¤µà¤¿à¤·à¥à¤£à¥‚चा अकरावा अवतार असताना तुम्हाला महागाई का रोखता येत नाही. महागाई रोखण तुमच्या हातामध्ये नाही मग तुमच्या हातामध्ये नक्की आहे तरी काय? नितीन गडकरी म्हणाले होते की आमचं सरकार येऊच शकत नाही. त्यामुळे त्यांनी टोलमाफीसारखी आश्वासने दिली. नितीन गडकरींनी लक्षात घ्याव मराठी माणसांनी खोटं बोलू नये. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हे शिकवलं नाही. 

20:04 (IST)18 Oct 2018
हिंदुंच्या सणांवर बंदी का आणता - उद्वव ठाकरे

डॉलरचा भाव आज ७४ रुपये झाला, उद्या १५० रुपये होईल तेव्हा मोदी म्हणतील त्याची  किंमत कमी होईल. रमझान असली की युद्धबंदी होते. मात्र, नवरात्र असल्यावर का होत नाही. हिंदुंच्या सणांवरच बंदी आणता. रमझानमध्ये युद्धबंदी केली ती कोणाबरोबर केली होती याचं उत्तर आहे का? 

19:56 (IST)18 Oct 2018
दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू - ठाकरे

दुष्काळाबाबत कर्नाटक सरकार निर्णय घेऊ शकते. मात्र, राज्यात आणि केंद्रातही एकाच पक्षाचे सरकरार असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रात का बोलत नाहीत. दुष्काळ आता लवकरात लवकर जहीर करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. 

19:54 (IST)18 Oct 2018
२०१४ सालची हवा आता राहिलेली नाही - उद्धव ठाकरे

भाजपाला सत्तेत बसवण्यात संघाचा हात होता. त्यामुळे संघाने त्यांना विचारायला हवं की तुम्ही सत्तेत का बसलात. बकरी झालेले कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसैनिकांत आहे. हवामानावर बोलायचं झाल्यास २०१४ सालची हवा आता राहिलेली नाही. तुम्हाला सर्वांना घेऊन मी जी टक्कर दिली होती. दुष्काळाबाबत राज्यात आणि केंद्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धमक का दाखवू शकत नाहीत. 

19:46 (IST)18 Oct 2018
देशातला हिंदू जिवंत आहे, हे विसरु नका - उद्धव ठाकरे

देशातला हिंदू जिवंत आहे, हे विसरु नका. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करुन बघाच कोण राहतयं ते आपण बघू. दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण समोर उभाच आहे. हे सिलेंडर आहे, पेट्रोल आहे. धनुष्यबाण आमचाच आहे ते पेलावायची ताकद आमच्याकडे आहे. 

19:38 (IST)18 Oct 2018
शिवसेनेचा दसरा मेळावा लाईव्ह
19:33 (IST)18 Oct 2018
शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ उद्धव ठाकरेंमुळेच - कदम

विधानसभेत विरोधीपक्ष नेते मुख्यमंत्र्यांसोबत बंद दरवाज्याआड दोन दोन तास बसलेले असतात. मग राज्यात विरोधी पक्षांचे काम कोण करणार. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे झाली आहे. या महाराष्ट्रावर पुन्हा भगवा फडकावयाचा असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवूयात. 

19:30 (IST)18 Oct 2018
कोणत्याही परिस्थितीत भाजपासोबत जायचं नाही - कदम

नोटाबंदीमुळे २०० लोकांचा जीव घेतला. आमच्या आया बहिणींना अठरा -अठरा तास रांगेत उभं केलं, खोदा पहाड निकला चुहा अशी या नोटाबंदीची अवस्था झाली. लोकांना बँकेत १५ लाख रुपये देण्याचे आश्वासनं दिलं लोकांची झोप उडवलीत. आता याला निवडणूकीत तुम्हाला जनता उत्तर देईल. कोणत्याही परिस्थीत भाजपासोबत जायचं नाही. लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

19:26 (IST)18 Oct 2018
पाकिस्तान केवळ शिवसेनाप्रमुखांनाच घाबरत होता - कदम

मोदी साहेब तुमची छप्पन इंच छाती गेली कुठे. इकडे आपल्या जवानांची मुंडकी उडवली जात आहेत. मोदी साहेब पाकिस्तानात जाऊन केक कापतात. तुम्ही कुठल्या तोंडनं मत मागणार. तुम्ही आमच्या जवानांचा अपमान केला आहे. या राज्यातील जनता या अपमानाचा बदला घेईल असा विश्वास आम्हाला आहे. मोदी साहेब पंतप्रधान पदी बसल्यानंतर ते उद्धव ठाकरेंची साध देतील असे आम्हाला वाटले होते. मात्र, शिवसेनेला संपवून टाका असे शब्द मोदींनी वापरले होते. 

19:23 (IST)18 Oct 2018
शिवसेना छोटा भाऊ की मोठा भाऊ दाखवून देऊ - रामदास कदम

आधी शिवसेनेला मोठा भाऊ संबोधलं जायचं मात्र, आता भाजपासाठी शिवसेना छोटा भाऊ झालीय. सेनेचं बोट पकडून भाजपानं मतं मिळवली. मात्र आता आगामी निवडणूकीत आम्ही दाखवून देऊ की शिवसेना छोटा भाऊ आहे की मोठा भाऊ.

19:19 (IST)18 Oct 2018
संपूर्ण आयोध्या उद्धव ठाकरेंची वाट पाहतेय - संजय राऊत

संपूर्ण आयोध्या उद्धव ठाकरेंची वाट पाहत आहे. à¤œà¤° शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आयोद्धेत पोहोचले नसते तर बाबरी पडली नसती. à¤¤à¤¿à¤¥à¤²à¥‡ साधू संत म्हणात, बाळासाहेब ठाकरे होते म्हणून बाबरीचा कलंक मिटला आणि आता उ्दधव ठाकरे येऊन येथे नक्कीच मंदिर बांधतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena dasara melava 2018 at shivaji park mumbai
First published on: 18-10-2018 at 19:14 IST