सलग चार वेळा पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षस्थान भूषविणारे राहुल शेवाळे खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांचे समितीतील सदस्यपद कायम ठेवण्यात आले होते. मात्र सदस्यपदाची मुदत १ एप्रिल रोजी संपुष्टात येत असल्यामुळे आता राहुल शेवाळे यांचे स्थायी समिती सदस्यपदही काढून घेण्यात आले आहे.
   तर गच्चीवरील हॉटेलच्या प्रस्तावावर वादग्रस्त विधान केल्याचा फटका शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांना बसला असून ‘मातोश्री’च्या नाराजीमुळे त्यांना सुधार समितीचे सदस्यत्व गमवावे लागले आहे.
शेवाळे लोकसभेमध्ये पोहोचले तरीही मनाने ते महापालिकेतच होते. त्यामुळे त्यांचे स्थायी समितीचे सदस्यपद कायम ठेवण्यात आले होते. मात्र आता ‘मातोश्री’ने त्यांची उचलबांगडी केली आहे.