14 November 2018

News Flash

गुजरातमधील ४७ मतदारसंघांत मुंबईकर शिवसैनिकांचा तळ

४७ मतदारसंघांत शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

सत्ताधारी भाजपला धक्का देण्याचा मनसुबा आखून शिवसेनेने विविध जिल्ह्य़ांमध्ये विखुरलेल्या सुमारे पाच ते सहा लाख मराठी मतांच्या भरवशावर शिवसेनेने गुजरातवर स्वारी करण्याची योजना आखली आहे. शिवसेनेने गुजरातमधील ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. त्यातही सुरत जिल्ह्य़ावर लक्ष केंद्रित केले आहे. हार्दिक पटेलची मदत घेत शिवसेनेने मुंबईकर शिवसैनिकांची फौज गुजरातला रवाना झाली आहे. या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘मातोश्री’ने पक्षातील काही विश्वासू सहकारी आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मराठीबहुल भाग हेरून ४७ मतदारसंघांत शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मतांचे विभाजन करून भाजपला धक्का देणे हा एकमेव उद्देश शिवसेनेचा आहे. एकटय़ा सुरत जिल्ह्य़ात सुमारे साडेतीन लाखांच्या घरात मराठी मतदार आहेत. मात्र ते १२ पैकी आठ विधानसभा मतदारसंघांत विखुरले आहेत. उदनामधील एकूण मतदारसंख्या दोन लाख ५० हजार असून त्यात ६५ हजार मराठी भाषक आहेत. चौरेशीमधील एकूण चार लाख ४५ हजार मतदारांमध्ये मराठी भाषकांची संख्या ८५ हजार आहे. मात्र ओलपाड (एकूण २ लाख ७५ हजार, मराठी भाषक ३० हजार), कामरेज (एकूण चार लाख ८६ हजार, मराठी भाषक १० हजार), मजुरा (एकूण २ लाख ३९ हजार, मराठी भाषक ३० हजार), कतारगाम (एकूण २ लाख ६७ हजार, मराठी भाषक ३० हजार), रानदेर (एकूण २ लाख १५ हजार, मराठी भाषक १६ हजार) या मतदारसंघात मराठी भाषकांची संख्या तुलनेत कमी आहे. पण हार्दिक पटेल आणि अन्य हिदुत्ववादी संघटनांच्या मदतीने शिवसेनेने रणनीती आखून भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे.

मुंबईमधून गुजरातला गेलेले लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी चोख बजावत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी काही विश्वासू शिवसैनिकांवर सोपविण्यात आली आहे. दिवसभराचा लेखाजोखा ‘मातोश्री’ला कळविण्याचे काम ही मंडळी करीत आहेत, त्यामुळे गुजरातमधील प्रचाराची माहिती ‘मातोश्री’पर्यंत पोहोचत आहे. गुजरातमध्ये केलेल्या चुकीचा मुंबईत फटका बसू शकतो या भीतीने मुंबईकर शिवसैनिकांच्या उरात धडकी भरली आहे. त्यामुळे गुजरातस्थित अधिकाधिक मराठी भाषकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मंडळी राबत आहेत. प्रचाराची रणधुमाळी थंडावल्यानंतरही छुप्या पद्धतीने पाहुणे बनून मराठी भाषकांशी संवाद साधण्याचे प्रयत्न मुंबईकर शिवसैनिक करीत आहेत.

साडेतीन लाख मराठी मतदार

एकटय़ा सुरत जिल्ह्य़ात सुमारे साडेतीन लाखांच्या घरात मराठी मतदार आहेत. मात्र ते १२ पैकी आठ विधानसभा मतदारसंघांत विखुरले आहेत. सूरत जिल्ह्य़ातील लिंबायत मतदारसंघात एकूण दोन लाख ६९ मतदार असून त्यापैकी ८५ हजार मतदार मराठी भाषक आहेत.

First Published on December 8, 2017 3:09 am

Web Title: shiv sena in gujarat