शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जगातल्या करोनाग्रस्तांच्या संख्येबाबत बोलू नये. कारण त्यांचे वडील म्हणजेच उद्धव ठाकरे ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. इथल्या परिस्थितीची तुलना न्यूयॉर्कशी करण्यापेक्षा इथली परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल ते बघा अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. एक ट्विट करत त्यांनी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Shiv Sena leader Aditya T shud not speak abt lows n world records..becz of his spineless chief minster..Maharashtra has the highest Corona numbers of all times!! Getting compared to New York now.. have some shame n do some real work n save us from this pandemic!!!
— nitesh rane (@NiteshNRane) May 22, 2020
करोनावर नियंत्रण आणण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपानं माझं अंगण रणांगण हे आंदोलन राज्यभरात सुरु केलं आहे. त्यासंदर्भातला फोटो ट्विट करुन आदित्य ठाकरे यांनी हे सगळं लज्जास्पद आहे अशी टीका आजच केली. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी न्यूयॉर्कची उदाहरणं देत बसू नये आधी महाराष्ट्रातील करोनाची समस्या नियंत्रणात आणावी असा खोचक सल्ला नितेश राणे यांनी त्यांना दिला आहे.
काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये?
“शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जगातल्या करोनाची उदाहरणं देऊ नयेत. आधी महाराष्ट्रात काय सुरु आहे ते बघावं. कणा नसलेले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची वाढलेली संख्या हे वास्तव आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशावेळी न्यूयॉर्कशी आपली तुलना करण्यापेक्षा इथली परिस्थिती सुधारण्यासाठी काही तरी करावं. इथल्या परिस्थितीबाबत थोडी तरी लाज बाळगावी” या आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 22, 2020 5:27 pm