13 August 2020

News Flash

मेट्रोविरोधात शिवसेना आमदार तुकाराम काते रस्त्यावर

मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कारशेडचे काम सुरू आहे.

मानखुर्द ते अंधेरीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा फटका अनेकांना बसत आहे. त्यातच मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरच्या रहिवांशाना मेट्रोच्या कामामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या मानखुर्दमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याविरोधात शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी रस्त्यावर उतरून मेट्रोविरोधात आंदोलन केलं.

मानखुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या कारशेडच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा या ठिकाणी होत असते. त्यामुळे या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरले आहे. त्यातच पावसाळा सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मन:स्ताप सहन करवा लागत आहे. दरम्यान, याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

याविरोधात तुकाराम काते यांनी रस्त्यावर उतरत चिखलात बसून स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी आंदोलन केलं. दरम्यान, एमएमआरडीएचे अधिकारी आणि मेट्रो प्रशासन या ठिकाणी येऊन रस्ता दुरूस्त करणार नाहीत तोवर हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचा इशारा काते यांनी यावेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 3:41 pm

Web Title: shiv sena mla tukaram kate protest against mumbai metro road problem jud 87
Next Stories
1 Video: “विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही!”
2 प्रवाशांना दिलासा; आजपासून मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत
3 कोकणातून समुद्रात जाणारे पाणी मराठवाडय़ाकडे वळवणार
Just Now!
X