28 October 2020

News Flash

‘भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पवारांशी चर्चा’

केंद्र सरकार व भाजपकडून राज्य सरकारविरोधात जे काही राजकीय प्रयत्न सुरू आहेत

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी भेट घेऊन चर्चा केली. केंद्र सरकार व भाजपकडून राज्य सरकारविरोधात जे काही राजकीय प्रयत्न सुरू आहेत, ते हाणून पाडण्यासाठी चर्चा केल्याचे राऊत यांनी सांगितले.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी पवार यांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली होती. ही भेट क्रिकेट संदर्भातील मुद्दयांवर होती, असे शेलार यांनी सांगितले असले तरी त्याबाबत राजकीय वर्तुळात आडाखे बांधले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनीही पवारांशी चर्चा केली.  पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे देशातील व राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 12:44 am

Web Title: shiv sena mp sanjay raut called on ncp president sharad pawar on wednesday abn 97
Next Stories
1 कर्जमुक्तीस पात्र उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा
2 दहिसर, मुलुंड आरोग्य केंद्रातील सर्व खाटा बाह्य़सेवा तत्त्वावर
3 मुंबईतील एक लाखाहून अधिक रुग्ण करोनामुक्त
Just Now!
X