28 January 2020

News Flash

मोदीजी, तुमच्याप्रमाणे कोणीही पंतप्रधान होऊ शकतो: संजय राऊत

देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर देशातील कोणताही सेवक पंतप्रधान बनू शकतो

या देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर देशातील कोणताही सेवक पंतप्रधान बनू शकतो, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानाबाबत केलेल्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली होती. मोदींच्या राहुल गांधी विरोधातील वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर कोणत्याही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

राहुल गांधींवर मोदींची टीका म्हणजे स्वत:चे ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पाहावे वाकून यातला प्रकार: शिवसेना

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला होता. यावर ‘हो नक्कीच’ असे उत्तर राहुल गांधींनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मोदींनी प्रचारसभेत घेतला होता. कर्नाटकामध्ये कोणीतरी मी पंतप्रधान होणार म्हणून महत्वाची घोषणा केली. स्वत:लाच अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा नाही का ? असा सवाल पंतप्रधान मोदींनी एका प्रचारसभेत विचारला होता. मोदींच्या या भूमिकेवर शिवसेनेने सामना या आपल्या मुखपत्रातूनही टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका करणे म्हणजे स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून यातला प्रकार आहे. काँग्रेसने भाजपाला विचारून त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा हा हट्ट कशासाठी?, असा प्रश्न शिवसेनेने विचारला. भाजपाने ‘यूपीए’तील मित्रपक्षांची चिंता सोडावी व आपल्या मित्रपक्षांच्या पाठीत जे खंजीर खुपसले गेले आहेत ते आधी पाहावे, असेही शिवसेनेने म्हटले होते.

या देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर देशातील कोणताही सेवक पंतप्रधान बनू शकतो, असे ते म्हणाले.

First Published on May 10, 2018 1:16 pm

Web Title: shiv sena mp sanjay raut speaks on pm narendra modi on his statement of rahul gandhi of to become a prime minister statement
Next Stories
1 धावत्या गाडीमध्ये थरार, प्रेयसीने नकार देताच त्याने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
2 सोनियांना इटालियन म्हटल्याने नरेंद्र मोदींवर भडकले राहुल गांधी
3 वॉलमार्ट बरोबर झालेल्या डीलमुळे फ्लिपकार्टचे मालकचं नव्हे कर्मचारीही बनले कोट्याधीश
Just Now!
X